पूल रमी कशी खेळतात ?
पूल रमीचे १०१ आणि २०१ असे दोन प्रकार आहेत. खेळाडूने आपले गुण १०१ किंवा २०१ पेक्षा कमी राखणे हे या प्रकाराचे उद्दिष्ट्य आहे. तुम्ही या खेळासाठीची किती रक्कम वापरायची हे ठरवू शकता
खेळाचे प्रकार | १०१/२०१ पूल |
खेळ सुरु करण्यासाठी लागणारे खेळाडू | २ किंवा ६ |
जिंकलेल्या रकमेची विभागणी | हो |
जास्तीत जास्त तोटा (प्रत्येक फेरीसाठी) | ८० गुण |
चुकीचा शो | ८० गुणांचा तोटा |
ऑटो ड्रॉप | हो |
फेरी सोडल्याचे गुण | १०१: पहिला ड्रॉप -२०, मधला ड्रॉप -४० आणि पूर्ण काउन्ट : ८० |
---|---|
२०१: पहिला ड्रॉप -२५, मधला ड्रॉप -५० आणि पूर्ण काउन्ट : ८० | |
पुन्हा सामील व्हा | १०१ पूल साठी ८० गुणांच्या खाली |
२०१ पूल साठी १७५ गुणांच्या खाली | |
पात्याचे कॅट | २ खेळाडूंच्या खेळासाठी १ कॅट |
६ खेळाडूंच्या खेळासाठी २ कॅट |
पूल रमीचे नियम:
- जिंकलेली रक्कम = (एंट्री फी x खेळणारे एकूण खेळाडू ) - क्लासिक रमीची फी
- खेळाच्या शेवटी ज्या खेळाडूचे सर्वात कमी गुण असतील त्याला विजेता म्हणून घोषित केले जाते
- जिंकणार्याच्या हातात एक शुद्ध अनुक्रम आणि एक शुद्ध किंवा अशुद्ध अनुक्रम असणे बंधनकारक आहे
- ज्या खेळाडूने वैध शो केला आहे त्याला ० गुण दिले जातात. तसेच बाकीच्या खेळाडूंना त्यांच्या हातातील पत्त्या प्रमाणे जे पत्ते वैध सिक्वेन्स चा भाग नाहीत त्यांच्या बेरजे प्रमाणे गुण दिले जातात
- दोन कॅट वापरात असताना तुम्ही एकच पत्ता एका सिक्वेन्स मध्ये दोनदा वापरू शकत नाही
- प्रत्येक फेरीच्या शेवटी तुमचे गुण आधीच्या गुणात मिळवले जातात. ज्या खेळाडूचे गुण १०१/२०१ किंवा त्या पेक्षा जास्त झाले तर तो खेळाडू बाद ठरवला जातो
- जर खेळाडूने मधेच खेळ सोडला तर त्याला एंट्री फी मिळत नाही
- खेळाडू खेळ सुरु असताना डिस्कनेक्ट झाला तर ६ खेळाडूंच्या प्रकारात पुढच्या तीन फेऱ्यांसाठी ऑटोप्ले फिचर सुरु होते आणि २ खेळाडूंच्या प्रकारात ते पुढच्या ५ फेऱ्यांसाठी सुरु होते
- ऑटो स्प्लिट
- २ खेळाडूंमध्ये ऑटो स्प्लिट:
- दोन पेक्षा जास्त खेळाडू असलेल्या 101/201या खेळ प्रकारामध्ये जेंव्हा फक्त २ खेळाडू उरलेले असतील आणि दोघांचेही गुण १०१ प्रकारा मध्ये ८० पेक्षा जास्त किंवा २०१ या प्रकारा मध्ये १७५ पेक्षा जास्त असतील तर बक्षिसाची रक्कम दोघांना सामायिक विभागून देण्यात येते.
- ३ खेळाडूंमध्ये ऑटो स्प्लिट:
- तीन पेक्षा जास्त खेळाडू असलेल्या 101/201 या खेळ प्रकारामध्ये जेंव्हा फक्त ३ खेळाडू उरलेले असतील आणि तिघांचेही गुण १०१ प्रकारा मध्ये ८० पेक्षा जास्त किंवा २०१ या प्रकारा मध्ये १७५ पेक्षा जास्त असतील तर बक्षिसाची रक्कम तिघांमध्ये सामायिक विभागून देण्यात येते
- ३ खेळाडूंचे ऑटो स्प्लिट तेंव्हाही लागू होते जेंव्हा खेळ ३ जणांपासून सुरु होतो आणि त्यातील एक जण खेळ पूर्ण झाल्यानंतर परत रुजू होऊन खेळ सुरु करतो
- मॅन्युअल स्प्लिट
- २ खेळाडू मॅन्युअल स्प्लिट:
- जर दोन्ही खेळाडूंनी मॅन्युअल स्प्लिट मान्य केले तर बक्षिसाची रक्कम गुण प्रमाणानुसार दोघांच्या मध्ये विभागून देण्यात येते. हि सुविधा 101 आणि 201 प्रकारासाठी उपलब्ध आहे ज्यात खेळ तीन खेळाडूंपेक्षा जास्त खेळाडूं पासून सुरु होतो
- ३ खेळाडू मॅन्युअल स्प्लिट:
- ३ खेळाडूंचे मॅन्युअल स्प्लिट तेंव्हाही लागू होते जेंव्हा खेळ ३ जणांपासून सुरु होतो आणि त्यातील एक जण खेळ पूर्ण झाल्यानंतर परत रुजू होऊन खेळ सुरु करतो
- ३ खेळाडूंच्या मॅन्युअल स्प्लिट मध्ये अट अशी आहे कि खेळ सुरु असताना शक्य असलेले ड्रॉप्स तीन पैकी कुठल्याही दोन खेळाडूंमध्ये २ पेक्षा जास्त नसले पाहिजेत. जर तीनही खेळाडूंनी मॅन्युअल स्प्लिट मान्य केले तर बक्षिसाची रक्कम गुण प्रमाणानुसार तिघांमध्ये विभागून देण्यात येते